पाकमधील कराची शहरात प्रवासी विमान रहिवासी भागावर कोसळले

विमानातील १०७ जणांसह रहिवासी भागातील काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

कराची (पाकिस्तान) – लाहोर येथून कराची येथे जाणारे पाकचे ए-३२० हे प्रवासी विमान कराची विमानतळाच्या जवळील रहिवासी भागात कोसळले. या विमानात ९८ प्रवासांसह ८ कर्मचारी होते. या सर्वांचा, तसेच रहिवासी भागातील काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे विमान विमानतळावर उतरण्याच्या एक मिनिट आधी कोसळले. या अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानाचे लँडिग गियर चालू न झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.