चीन घुसखोरीद्वारे भारतासह शेजारील देशांना घाबरवत आहे ! – अमेरिका

अमेरिका थेट चीनचे नाव घेऊन त्याच्यावर अशा प्रकारची टीका करत आहे; मात्र चीन भारतीय सीमेत घुसखोरी करत असतांना भारत मात्र अशा प्रकारे परखडपणे बोलण्याचे टाळत आहे, असे का ?

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीन त्याच्या तत्त्वांचे उल्लंघन करत आहे. चीन पिवळा समुद्र, पूर्व आणि दक्षिण चीन सागर, तैवान सामुद्रधुनी अन् भारतीय सीमेत घुसखोरी करून शेजार देशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरात चीन सामर्थ्यपूर्ण होण्याच्या उद्दिष्टाने काम करत आहे. कोणत्याही देशाला तो जुमानत नाही. असे करून तो त्याची शक्ती वाढल्याचे जगाला दाखवत आहे आणि त्याचसमवेत शक्तीचा दुरुपयोगही करत आहे, असा आरोप अमेरिकेने केला आहे. युनायटेड स्टेट्स स्ट्रॅटेजिक अ‍ॅप्रोच टू पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या नावाचा अहवाल अमेरिकी संसदेला सादर करण्यात आला आहे. या अहवालात चीनविषयी वरील मत मांडण्यात आले आहे. तसेच अमेरिकी सरकारचे चीनसंदर्भातील धोरण सुस्पष्ट मांडण्यात आले आहे.

अमेरिकेच्या या अहवालातील आरोपांवर चीनने प्रतिक्रिया व्यक्त करतांना यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. चीनने म्हटले आहे की, आम्ही सैन्य शक्तीच्या वापराला विरोध करतो, इतर देशांच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप करत नाही आणि शांततेच्या वाटाघाटीद्वारे सर्व वाद मिटवण्यास कटीबद्ध आहेत. (विश्‍वासघातकी, धूर्त, विस्तारवादी महत्त्वाकांक्षा असलेल्या पाताळयंत्री चीनवर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)