२१ जूनच्या सूर्यग्रहणापर्यंत कोरोनाचा प्रभाव राहील ! – काशीच्या ज्योतिषाचार्यांचा अंदाज

२६ डिसेंबर २०१९ या दिवशीच्या सूर्यग्रहणापासून चालू झालेले कोरोनाचे संक्रमण २१ जून २०२० या दिवशीच्या सुर्यग्रहणापर्यंत कायम रहाण्याचा अंदाज

वाराणसी (उत्तरप्रदेश) – शनि जयंतीदिनी काशीच्या ज्योतिषांनी कोरोनाच्या संक्रमण काळाची भविष्यवाणी वर्तवली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, शनि जयंतीच्या दिवशी ४ ग्रह एकाच राशीमध्ये रहाणार आहेत. या योगामुळे २२ मे नंतर कोरोनाची महामारी शक्तीहीन होत जाणार आहे. कोणत्याही व्याधीच्या संक्रमणाचा कालावधी एक ग्रहण ते दुसरे ग्रहण, असा असतो. यामुळे कोरोनाचे संक्रमण गेल्या वर्षी झालेल्या २६ डिसेंबरच्या सूर्यग्रहणापासून चालू झाले होते. आता २१ जूनला पुढील सूर्यग्रहण आहे. यामुळे कोरोनाचे संकट या ग्रहणापर्यंच रहाणार आहे.

ज्योतिषाचार्य आणि काशी विद्वत परिषदेचे संघटन मंत्री पंडित दीपक मालवीन यांना सांगितले की, ज्योतिष शास्त्रानुसार २२ मे या दिवशी होणारा शनि जयंतीवेळेचा संयोग कोरोनासारख्या महामारीला हरवण्यासाठी उपयुक्त ठरील. शनि जयंतीनंतर कोरोनाच्या उद्रेकामध्ये न्यूनता येण्याची शक्यता आहे.