नेपाळ भारताच्या सीमेवर ३ सशस्त्र पोलीस चौक्या उभारणार

चीनच्या शक्तीवर भारताला आव्हान देण्याचा नेपाळचा प्रयत्न कीव करणारच आहे. भारतानेही नेपाळच्या या आगळिकीला जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

पिथौरागड (उत्तराखंड) – भारताच्या भूभागावर दावा केल्यानंतर आता नेपाळकडून भारताच्या सीमेवर झूलाघाट, लाली आणि पंचेश्‍वर या भागांत सशस्त्र पोलीसदलाच्या ३ चौक्या उभारण्यात येणार आहेत. नेपाळने गेल्या आठवड्यात चांगरू येथे २५ पोलिसांना पाठवून आउटपोस्ट सिद्ध केले होते. आता तो आणखी ३ आउटपोस्ट सिद्ध करणार आहे. या तिन्ही भागांत भारत आणि नेपाळमध्ये येण्या-जाण्यासाठी पूलाचा वापर केला जातो.

भारत-नेपाळ सीमेवर भारताकडून सशस्त्र सीमा सुरक्षा दलाचे सैनिक तैनात असतात, तर नेपाळमध्ये सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त असतो. झुलाघाट हे प्रमुख आउटपोस्ट आहे. दळणवळर बंदीपूर्वी या ठिकाणांहून शेकडो नागरिकांची ये-जा चालू होती. या ठिकाणी नेपाळकडून एक इमारत भाडेतत्वावर घेण्यात आली असून त्यातच आउटपोस्ट बनवण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.