मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बद्वारे ठार मारण्याची धमकी

 

  • उत्तरप्रदेश सरकारच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरच पाठवण्यात आला संदेश
  • उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिंदु धर्म आणि हिंदू यांच्याविषयी चांगले काम करत असल्यामुळे त्यांना अनेक शत्रू निर्माण होणार, यात शंकाच नाही. त्यामुळे उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करून सतर्क रहावे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बद्वारे ठार करण्याची धमकी देणारा संदेश उत्तरप्रदेश सरकारच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या धमकीमध्ये लिहिले होते की, मी योगी आदित्यनाथ यांना बॉम्बद्वारे ठार मारणार आहे. तसेच त्याने योगी आदित्यनाथ यांना ते काही जणांचे शत्रू असल्याचे म्हटले आहे. ही धमकी येताच पोलीस अधिकार्‍यांनी ज्या भ्रमणभाष क्रमांकावरून हा धमकीचा संदेश पाठवण्यात आला, त्याचा शोध घेणे चालू केले, तसेच पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.