केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदीचा निर्णय एका वर्षासाठी स्थगित

नवी देहली – श्रीगणेशमूर्तींसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपीच्या) मूर्तींवरील बंदीचा निर्णय एका वर्षासाठी स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. यंदाच्या गणेशोत्सवासाठी ज्यांनी पूर्वीच पीओपीच्या मूर्ती बनवल्या असतील, अशा मूर्तीकारांची या निर्णयामुळे हानी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली होती. हा निर्णय केंद्र सरकारने पालटला. गणेशोत्सवासाठी श्रीगणेशमूर्ती निर्मितीचे काम यापूर्वीच चालू झाले आहे. सरकारने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महाराष्ट्रात अर्ध्याहून अधिक श्रीगणेशमूर्ती सिद्ध झाल्या होत्या. या निर्णयामुळे असंख्या मूर्तीकारांची मोठी हानी होणार होती. अनेक मूर्तीकारांनी सरकारकडे यंदाच्या वर्षी पीओपीच्या मूर्तींवर बंदी न घालण्याची मागणी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.