चीनच्या वुहानमध्ये जंगली प्राण्यांच्या मांसांची खरेदी-विक्री करणे आणि मांस खाणे, यांवर ५ वर्षांसाठी बंदी

जगाच्या दबावानंतर वरवरची उपाययोजना करणारा चीन ! भारतासह जगभरातील सर्व राष्ट्रांनी चीनवर प्रथम कोरोनाविषयीचे सत्य सांगण्यासाठी दबाव आणायला हवा !

वुहान (चीन) – जगात कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या शहरातून झाला, त्या चीनमधील वुहान शहरामध्ये जंगली प्राण्यांच्या मासांची खरेदी-विक्री करणे आणि असे मांस खाणे यांवर चीन सरकारने पुढील ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वुहान हे वन्यजीव संवर्धन करणारे शहर आहे. कुणीही तेथे प्राण्यांना मारून त्यांचे मांस विक्री करू नये, असेही चीन सरकारने स्पष्ट केले आहे.