महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील लाच मागणार्‍या लेखापालास अटक

भ्रष्टाचाराने पोखरलेली शासकीय यंत्रणा !

नागपूर – कंत्राटाची देयके संमत करण्यासाठी १ सहस्र रुपयांची लाच मागणारे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील लेखापाल राजेश हाडके (वय ५४ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० मे या दिवशी अटक केली. तक्रारदाराला १० गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट मिळाले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्याची देयके सादर केली होती.