नियमांचे उल्लंघन करणार्‍या आणि सरकारी कामात अडथळा आणणार्‍या मुंब्रा येथील ८ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद

ठाणे – कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या कारवाईत सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या आणि सरकारी कामात अडथळा आणणार्‍या मुंब्रा येथील पापा, अन्वर सय्यद, अबूल गणी मर्चंट, एस्.एफ्. रजा, फैजान शेख, इकबाल मोहम्मद अलीशेख, अफजल मोहम्मद बशीर शेख, मोहम्मद शाहीद शेख यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच तेथील २०० दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मास्क न लावणार्‍या ३२ दुकानदारांकडून प्रत्येकी १ सहस्र रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे.