आपत्कालीन परिस्थितीत सनातनची सात्त्विक उत्पादने उपलब्ध नसल्यास मानसरित्या उपाय करून चैतन्य मिळवा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

‘वादळ, भूस्खलन, भूकंप, महापूर, दळणवळण बंदी अशी आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा स्थितीत अत्तर, कापूर, उदबत्ती, गोमूत्र आदी सनातनची सात्त्विक उत्पादने उपलब्ध होणार नाहीत. अशा वेळी साधक पुढीलप्रमाणे मानस-उपाय करू शकतात.

१. मानस-उपाय करण्याचे महत्त्व !

आपत्कालीन स्थितीत उपायांची साधने उपलब्ध नसतांना मानस-उपाय करणे सहज शक्य आहे. हे उपाय भावपूर्ण केले, तर प्रत्यक्ष उपाय केल्याने जेवढा लाभ होतो, तेवढा लाभ होतो.

२. अत्तर, कापूर आणि उदबत्ती यांनी मानस-उपाय कसे करावेत ?

अत्तर, कापूर, उदबत्ती आदी उपलब्ध असतांना त्यांद्वारे साधक जसे उपाय करतात, तसे उपाय ही उत्पादने नसतांनाही करता येतील. ‘एरव्ही उपाय करतांना ज्या कृती करतो, त्या आताही करत आहोत’, असा भाव ठेवून मानसरित्या उपाय करावेत.

३. मानसरित्या स्वतःवरचे आवरण काढावे.

४. वास्तूशुद्धी कशी करावी ?

घरात गोमूत्र उपलब्ध नसल्यास वास्तूशुद्धीसाठी पुढील उपाय करता येईल. एका पेल्यात थोडे पाणी घ्यावे. त्यावर उजवा हात ठेवून सध्या समष्टी स्तरावरील त्रास दूर करण्यासाठीचा ‘निर्गुण’ हा नामजप १० मिनिटे करावा. नामजपामुळे भारित झालेले पाणी शिंपडून वास्तूशुद्धी करू शकतो. घरात मासिक धर्म चालू असलेली महिला असल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला सुवेर किंवा सुतक असल्यास तिने हा उपाय स्वतः न करता अन्य साधकांनी करावा.

साधकांनो, ‘मानस-उपाय भावपूर्ण केले, तर प्रत्यक्ष उपायांप्रमाणेच त्यांचा लाभ होणार आहे’, अशी श्रद्धा ठेवून हे उपाय करा !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०२०)