पाकमध्ये लहान मुलांच्या गणिताच्या पुस्तकामध्ये डुकराचे चित्र प्रसिद्ध केल्याने पुस्तकावर बंदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील लहान मुलांच्या गणिताच्या पुस्तकात डुकराचे चित्र प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे या पुस्तकावर पंजाब सरकारने बंदी घातली आहे. इस्लाम आणि पाकिस्तान यांच्या सुरक्षेसाठी ही बंदी घातली जात आहे, असे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या पुस्तक मंडळाने म्हटले की, हे पुस्तक विनाअनुमती विकले जात होते.