कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ‘अर्सेनिक आल्ब ३०’ हे होमिओपॅथीचे औषध घ्या !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

‘कोरोना’ या विषाणूंच्या संसर्गामुळे होणार्‍या आजारापासून आपले संरक्षण व्हावे किंवा त्याला प्रतिबंध व्हावा’, यासाठी आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात होमिओपॅथीचे ‘अर्सेनिक आल्ब ३०’ हे औषध सुचवले होते. ‘हे प्रतिबंधात्मक औषध सर्वत्रच्या साधकांनी आवर्जून घ्यावे’, अशी महर्षींची आज्ञा आहे. त्यानुसार सर्वत्रच्या साधकांनी हे औषध घ्यावयाचे आहे.

या औषधाच्या गोळ्या ‘होमिओपॅथी मेडिकल’मध्ये उपलब्ध असतात. काही ठिकाणी शासन या गोळ्या नागरिकांना विनामूल्य वितरित करत आहे.

वैद्य प्रवीण मेहता

१. औषध किती दिवस घ्यावे ?

औषधाचे पुढीलप्रमाणे ३ ‘कोर्स’ करावेत.

सलग ३ दिवस प्रतिदिन ५ गोळ्या सकाळी उपाशीपोटी घ्याव्यात. हा एक ‘कोर्स’ झाला. त्यानंतर १० दिवस औषध घेऊ नये. पुन्हा अकराव्या दिवसापासून सलग ३ दिवस प्रतिदिन ५ गोळ्या घ्याव्यात. हा दुसरा ‘कोर्स’ झाला. त्यानंतर १० दिवस औषध घेऊ नये. अकराव्या दिवसापासून सलग ३ दिवस प्रतिदिन ५ गोळ्या घ्याव्यात. हा तिसरा ‘कोर्स’ झाला.

‘सलग ३ दिवस औषध घेण्यात खंड पडणार नाही’, याची दक्षता घ्यावी. काही कारणामुळे एखादा दिवस खंड पडला, तर पुढच्या (चौथ्या) दिवशी औषध घेऊ शकतो. त्यानंतर १० दिवसांच्या अंतराने पुन्हा ३ दिवस औषध घेऊ शकतो.

२. औषध कुणी आणि किती प्रमाणात घ्यावे ?

अ. ५ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुलांना २ गोळ्या पाण्यात विरघळून द्याव्यात.

आ. ५ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांना ३ गोळ्या द्याव्यात.

इ. इतरांनी (९ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांनी) ५ गोळ्या घ्याव्यात. (गर्भवती महिला हे औषध घेऊ शकतात.)

३. अन्य महत्त्वाच्या सूचना

अ. सकाळी उठल्यावर चूळ भरून (दात न घासता) औषध घ्यावे. ‘या गोळ्यांना आपल्या हातांचा स्पर्श होणार नाही’, याची काळजी घ्यावी. गोळ्यांच्या डबीच्या झाकणामध्ये ५ गोळ्या घेऊन जिभेवर सोडाव्यात आणि त्या चघळून खाव्यात.

आ. औषध घेतल्यानंतर पुढील अर्धा घंटा काहीही खाऊ-पिऊ नये. त्यानंतर दात घासू शकतो आणि चहा, अल्पाहार आदी घेऊ शकतो. औषध घेतल्यानंतर अर्धा घंटा कापूर आणि अत्तर यांचे उपाय करू नयेत.

इ. काही वेळा औषध घेतल्यावर सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी घाबरून न जाता औषध घेणे थांबवावे आणि १० दिवसांनी पुन्हा पुढील ‘कोर्स’ चालू करावा.

ई. औषधाची बाटली कापूर, अत्तर, उदबत्ती, कॉफी, हिंग आदी उग्र गंध असलेल्या पदार्थांजवळ ठेवू नये.

साधकांनो, महर्षींच्या आज्ञेप्रमाणे ‘अर्सेनिक आल्ब ३०’ हे औषध खंड पडू न देता घेऊन महर्षींचे आज्ञापालन करा !’

– आधुनिक वैद्य प्रवीण मेहता, पुणे (१९.५.२०२०)