गर्वाने सांगतो की, मी हिंदु आहे !

ब्रिटनचे नवनिर्वाचित अर्थमंत्री ऋषि सुनक यांचे रोखठोक प्रतिपादन !

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी अशा प्रकारे ठामपणे ते हिंदु असल्याचे अभिमानाने सांगतात का ? विदेशातील हिंदु लोकप्रतिनिधींकडून भारतातील निधर्मी हिंदु लोकप्रतिनिधींनी बोध घ्यावा !

लंडन – भारतातील प्रसिद्ध आस्थापन असणारे ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषि सुनक यांची ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ‘ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ हे दायित्व सोपवण्यात आले आहे. ऋषि सुनक यांनी खासदारकी आणि मंत्रीपद यांची शपथ घेतांना श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यावरून ब्रिटनच्या नागरिकांनी त्यांना विरोध केला होता. (केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंनी धर्मपालन केल्यास त्यावर कशा प्रकारे आक्षेप घेतला जातो, याचे हे उदाहरण होय. अशांसमोर न झुकणारे सुनक यांचे अभिनंदन ! – संपादक) याविषयी त्यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता ऋषि सुनक म्हणाले, ‘‘मी आता ब्रिटनचा नागरिक असलो, तरी माझा धर्म हिंदु आहे. माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. मी गर्वाने म्हणतो की, मी हिंदु आहे आणि माझी ओळख हिंदु आहे.

ऋषि सुनक हे वर्ष २०१५ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची प्रथम स्थानिक सरकारच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली होती.