(म्हणे) ‘पुलवामा येथील आक्रमणाचा सर्वाधिक लाभ कोणाला झाला ?’

राहुल गांधी यांच्याकडून अशा प्रकारे प्रश्‍न उपस्थित करून सैनिकांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार चालूच !

‘म. गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ कोणाला झाला ?’,‘इंदिरा गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ कोणाला झाला ?’, ‘राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ कोणाला झाला ?’, ‘लालबहादूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूचा सर्वाधिक लाभ कोणाला झाला ?’, असे काही प्रश्‍न जनतेच्या मनात उमटत असतात. त्याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे !

नवी देहली – आज जेव्हा आपण सगळे पुलवामा येथील आक्रमणात हुतात्मा झालेल्या ४० सैनिकांचे स्मरण करत आहोत, तेव्हा आपल्याला पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाचा सर्वांत अधिक लाभ कोणाला झाला ? या आक्रमणाच्या चौकशीत काय आढळले ? सुरक्षेतील ढिसाळपणासाठी मोदी सरकारमध्ये कोणाला उत्तरदायी ठरवण्यात आले ?, असे ३ प्रश्‍न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा येथील आक्रमणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ट्वीट करून विचारले आहेत.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते महंमद सलीम यांनीही या आक्रमणाविषयी प्रश्‍न विचारले आहेत. ते म्हणाले की, आम्हाला सैनिकांचे स्मारक नको, तर आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की, आंतरराष्ट्रीय सीमेवरून ८० किलो आर्.डी.एक्स. भारतात आलेच कसे ? तेसुद्धा त्या स्थळावरून जेथे सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ? (केरळमध्ये साम्यवाद्यांच्या राज्यात जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची पाळेमुळे झपाट्याने खोलवर रूतत आहे. ती कशी ? अशा आतंकवादी आणि जिहादी संघटना यांची कोण पाठराखण करत आहे, याचे उत्तर माकपवाल्यांनी प्रथम द्यावे आणि नंतर प्रतिप्रश्‍न करावेत ! – संपादक)