मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचारातील ५३ आरोपींकडून २३ लाख रुपये वसूल केले जाणार !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात धर्मांधांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी ५३ धर्मांधांकडून २३ लाख ४१ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

२० डिसेंबर २०१९ ला शहरातील विविध भागांत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फूटेजच्या आधारावर आरोपींची ओळख पटवण्यात आली. या सर्वांना सरकारी मालमत्तेची हानी केल्यावरून हानीभरपाई भरण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या. या प्रकरणी न्यायालयानेही ‘या ओळख पटवण्यात आलेल्या आरोपींकडून रक्कम वसूल करण्यात यावी’, असे म्हटले आहे.