म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी केलेल्या आतंकवादी आक्रमणात २० विद्यार्थी घायाळ

रोहिंग्यांविषयी कळवळा असणारे या आक्रमणाविषयी का बोलत नाहीत ?

यंगून (म्यानमार) – म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्यांची आतंकवादी संघटना अराकान आर्मीच्या आतंकवाद्यांनी एका प्राथमिक शाळेवर मोर्टारद्वारे आक्रमण केले. यात २० विद्यार्थी घायाळ झाले. त्यांनी येथील बुटहाइडुंगमधील सैनिकांच्या एका पथकावर आक्रमण केले. त्यांना सैनिकांनी प्रत्युत्तर दिल्यावर आतंकवाद्यांनी मोर्टारचा मारा केला. त्यात या शाळेची हानी झाली.