भारत हा चैतन्याचा स्रोत असल्याने ईश्‍वरी चैतन्य सहन न होणार्‍या शक्तींनी तो स्रोत नष्ट करण्याचा प्रयत्न आरंभणे

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज

भारतातील हिमालय, अरवली आणि सातपुडा या पर्वतांमुळे झालेला ‘वरचा त्रिकोण’, तसेच विंध्यपर्वत, पूर्वघाट अन् पश्‍चिमघाट यांमुळे झालेला ‘खालचा त्रिकोण’ या दोन त्रिकोणांमुळे भारत ‘श्रीचक्र’ बनले आहे. यामुळे या ठिकाणी पुष्कळ चैतन्य निर्माण झाले आहे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी या केवळ नद्या नसून चैतन्याचा स्रोेत आहेत. मधुरस, जल, पवन, मनोहारी दृश्ये, औषधी रस, मेघ, मधु, गाय, दूध, दही, तूप, अश्‍व, शेती, गुरु, माता, पिता, स्वामी, ज्ञानी, वेदवाणी, पृथ्वी, अंतरीक्ष, द्यौ, सूर्य, चंद्र, विद्युत, ब्राह्मण, विद्वान पुरुष, धर्माचरणी राजा, धान्य, यव आदींमध्ये चैतन्यमयी ब्रह्मरस भरला आहे. अथर्ववेदात यालाच ‘मधुकशा’ असे म्हटले आहे. भारत विश्‍वाचे आध्यात्मिक केंद्र आहे. येथेच भगवंताच्या अवतारांनी जन्म घेतला आहे. येथे अनेक तीर्थक्षेत्रे आहेत; अत्युच्च पातळीचे साधूसंत, महात्मे येथे जन्मले आणि जन्म घेत आहेत. त्यामुळे ही भूमी पवित्र असून येथे चैतन्याचा स्रोेत आहे.

ही चैतन्यशक्तीच रज-तमाचा प्रभाव न्यून करू शकते; परंतु जेव्हा या शक्तीवर आवरण वाढून ती निष्प्रभ होते, तेव्हा विकृती निर्माण होऊन धर्माची अधोगती चालू होते. भारतातील ईश्‍वरी चैतन्य धर्मांध आणि ख्रिस्ती यांना सहन न झाल्याने त्यांनी चैतन्याचे स्रोत नाहीसे करण्याचा कसोशीने प्रयत्न आरंभला आहे.’

– परात्पर गुरु परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.६.२०१६)