सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी आदींच्या प्रतिमा काढा !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा आदेश

काँग्रेस स्वातंत्र्यापूर्वीपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करत आली आहे; मात्र सावरकर यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेला आदरभाव जराही अल्प झालेला नसून उलट त्यांची कीर्ती वाढतच आहे, हे तिच्या लक्षात येईल तो सुदिन !

जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या काँग्रेस सरकारने सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित दीनदयाळ उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमा काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. त्याऐवजी म. गांधी, नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावण्याचा आदेश दिला आहे. ‘या आदेशाचे पालन न करणार्‍या शाळांवर कारवाई करण्यात येईल’, असे सरकारने म्हटले आहे. राजस्थानमध्ये भाजप सत्तेत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर, उपाध्याय, हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या; मात्र हे सर्व नेते भाजपचे आदर्श असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.