बांगलादेशातील शालेय पुस्तकांत इस्लामी शिकवण देणार्‍या लेखनाचा समावेश ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

देशाची भावी पिढी कट्टरवादी आणि हिंदुद्वेषी बनवण्याचा घाट बांगलादेशने घातला आहे. त्यामुळे येणार्‍या काळात तेथील हिंदूंचा वंशविच्छेद चालूच राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. हे लक्षात घेऊन पाकसह आता बांगलादेशाशीही दोन हात करण्यासाठी भारत सरकारने सिद्ध व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

नवी देहली – बांगलादेशमधील तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारने शालेय पुस्तकांत पालट करून इस्लामची शिकवण देणार्‍या लेखनाचा समावेश केला आहे. तेथील शालेय पुस्तकांमध्ये बिगर मुसलमानांकडून लिहिले गेलेले लिखाण पालटून मुसलमानांनी लिहिलेले लिखाण अंतर्भूत करण्यात आले आहे. द्विराष्ट्र सिद्धांत हा जिनांनासुद्धा मान्य नव्हता; परंतु पंतप्रधान शेख हसीना यांना मान्य आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुकतेच केले आहे. (जिना यांनीच द्विराष्ट्र सिद्धांत मांडून वेगळ्या पाकिस्तान देशाची मागणी केली आणि हिंदूंचा नरसंहार करून तो मिळवलाही होता. हा इतिहास तस्लिमा नसरीन यांनी समजून घ्यावा ! – संपादक)