गाऊ द्या रे मज श्री गुरूंचे यशोगान ।

श्री. प्रवीण देसाई

या रे या रे शब्दांनो, अंतःकरणाच्या झरोक्यातून ।
गाऊ द्या रे मज, श्री गुरूंचे यशोगान ॥ १ ॥

श्री गुरु माझे प्रेमळ उदार ।
सार्‍या विश्वासी, असे तो एक आधार ॥ २ ॥

घडो नित्य अंतरी श्री गुरुपूजन ।
क्षणोक्षणी राहो, मज त्यांचे पुण्यस्मरण ॥ ३ ॥

श्री गुरु असती कृपेचा सागर ।
तारूनी नेती हा भवसागर ॥ ४ ॥

श्री गुरु दिसती, जणू चैतन्याची मूर्ती ।
गाजते दिगंतरी, अपार त्यांची कीर्ती ॥ ५ ॥

करितो दयाघना, तुझेच स्तवन ।
आलो रे दयाळा, तुला मी शरण ॥ ६ ॥

प्रार्थितो तुजला हे तुझेच जीवन ।
सांभाळी देवा, करी साधकांचे रक्षण ॥ ७ ॥

या रे या रे शब्दांनो, अंतःकरणाच्या झरोक्यातून ।
गाऊ द्या रे मज, श्री गुरूंचे यशोगान ॥ ८ ॥

– श्री. प्रवीण देसाई, पनवेल. (२.७.२०१८)