चेन्नई येथील पुस्तक मेळाव्यात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रंथप्रदर्शनावर ग्रंथ वितरणाची सेवा करतांना १. ७५ वर्षे वयाचे साधक श्री. प्रभाकरन्

चेन्नई – येथील वाय.एम्.सी.ए. येथे ९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या ४३ व्या पुस्तक मेळाव्यात ग्रंथप्रदर्शनामध्ये सनातन संस्थेने सहभाग घेतला. या ग्रंथप्रदर्शनातील ‘कंदालगम’ कक्षावर तमिळ भाषेतील सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ ठेवण्यात आले होते. जवळजवळ १० सहस्र वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्यासह सनातनच्या साधकांनी या प्रदर्शनकक्षावर सेवा केली.

ग्रंथप्रदर्शनाला भेट देणारे ‘आर्.बी.व्ही.एस्.’चे श्री. मनियनजी यांना सनातनचे ग्रंथ भेट देतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

क्षणचित्रे 

१. सनातनच्या कार्याला सहकार्य करणार्‍या देहली येथील एका धर्माभिमानी हिंदूने चेन्नई येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. येथील कक्षावर सनातनच्या साधकांना भेटून त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी तमिळ भाषेतील सनातनच्या ग्रंथांचा पूर्ण संच विकत घेतला.

२. चेन्नई येथील एका मशिदीच्या मौलवींनी प्रदर्शनकक्षाला भेट दिली. त्यांनी ग्रंथांचा पूर्ण संच विकत घेतला. हिंदु ग्रंथांतून ज्ञान मिळवण्याची आवड असल्याचे त्यांनी सांगितले. तमिळ संत थिरूमूलार यांनी लिहिलेला ‘थिरूमंदिरम्’ हा प्रसिद्ध ग्रंथ समजून घेण्यासाठी अभ्यासवर्गाला जात आहे. ग्रंथ वाचल्यावर अजून माहिती जाणून घेण्यासाठी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्याचे या मौलवींनी सांगितले.

३. चेन्नई येथील ७५ वर्षे वयाचे साधक श्री. प्रभाकरन् यांनी सलग चार दिवस प्रदर्शन कक्षावर सेवा केली. सनातन संस्थेच्या ग्रंथांविषयी कक्षाला भेट देणार्‍या जिज्ञासूंना माहिती देण्यासाठी त्यांनी प्रतिदिन ३ घंटे ३० मिनिटे उभे राहून सेवा केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे सनातनच्या ग्रंथांचीही चांगल्या प्रकारे विक्री झाली.

४. एका अधिवक्त्यांनी थिरूवन्नमलाई येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून सनातनचे काही ग्रंथ खरेदी केले होते. चेन्नई येथील ग्रंथप्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. ग्रंथ वाचून त्यांनी आपल्या कुटुंबात वाढदिवस इंग्रजी पद्धतीने साजरा करणे बंद केल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी अजून काही ग्रंथ विकत घेतले, तसेच ‘सनातन प्रभात’विषयी त्यांनी उत्सुकतेने जाणून घेतले.