विविध उपक्रमांच्या वेळी जिज्ञासूंकडून योग्य प्रकारे अभिप्राय मिळावेत, यासाठी वक्त्यांनी व्यासपिठावरूनच अभिप्राय-पत्रक दाखवून ‘त्यात काय लिहिणे अपेक्षित आहे ?’, हे सांगावे !

समितीसेवक आणि जिल्हासेवक यांना सूचना

प्रत्येक जिल्ह्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा, गुरुपौर्णिमा आदींचे आयोजन करण्यात येते. ‘या कार्यक्रमांमध्ये येणारे जिज्ञासू संस्था किंवा समिती यांच्या कार्याशी कशा प्रकारे जोडले जाऊ शकतात ?’, याची माहिती होण्यासाठी त्यांना अभिप्राय-पत्रके दिली जातात. जिज्ञासूंना अभिप्राय-पत्रके दिल्यावर एकतर ती कोरी असतात किंवा ‘तुमचा कार्यक्रम फार आवडला’, असे त्यांवर लिहिलेले असते. काही वेळा सर्व रकान्यांवर  अशी खूण असते. क्वचितच एखाद-दुसरा योग्य अभिप्राय येतो.

‘अभिप्राय-पत्रकात नेमकेपणाने काय लिहायचे ?’, हे जिज्ञासूूला ठाऊक नसते. पत्रके भरायला सांगितली; म्हणून भरली जातात’, असे लक्षात येते. अभिप्राय-पत्रके योग्य प्रकारे भरली जावीत, यासाठी वक्त्याने व्यासपिठावरूनच अभिप्राय-पत्रक दाखवून ‘त्या पत्रकात काय लिहिणे अपेक्षित आहे ?’, हे सांगावे. एका सभेत हा प्रयोग केल्यावर जवळजवळ ८० टक्के अभिप्राय-पत्रके योग्य प्रकारे भरली गेल्याचे लक्षात आले. सर्वच ठिकाणी असे केल्यास अभिप्राय-पत्रके देण्यामागील हेतू साध्य होईल, तसेच साधकांची सेवा ईश्‍वराला अपेक्षित अशी होईल.