‘सनातन प्रभात’च्या वाचनाने स्वत:मध्ये आंतरिक पालट अनुभवणारे वाचक !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्‍चिम महाराष्ट्र आवृत्तीचा वर्धापनदिन नुकताच झाला. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय, केलेल्या चांगल्या कृती आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयी माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या लिखाणातून ‘सनातन प्रभातचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने ‘सनातन प्रभात’ हे केवळ एक वर्तमानपत्र राहिले नसून राष्ट्र्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या अंतरंगात पालट करणारी, ज्ञानामृत पाजणारी एक चळवळ झाली आहे’, याची खात्री येते. यातून ‘आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे ‘सनातन प्रभात’ हे बोधवाक्य सार्थ ठरते. पत्रकारितेच्या इतिहासात वाचकांमध्ये धर्माची गोडी निर्माण करून ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाकडे वळवणार्‍या एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ची सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाईल, याची निश्‍चिती आहे.

पुणे येथील मंदिराच्या प्रत्येक उपक्रमात धर्माचरण होण्यासाठी ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या माहितीनुसार आचरण करणे

इंद्रायणीनगर, भोसरी (जिल्हा पुणे) येथील श्री गणेश मंदिरामध्ये ९ वर्षांपासून दैनिक चालू आहे. या दैनिकात सांगितल्याप्रमाणे या मंदिरातील प्रत्येक उपक्रमात धर्माचरण होण्यासाठी कृती होते. गणेशोत्सवामध्ये वाहत्या पाण्यात श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करावे, दीपावली, तसेच विवाहप्रसंगी फटाके वाजवू नयेत हे, दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून वाचणार्‍यांना समजले. तेव्हापासून मंदिरातील गणेशोत्सवामध्ये असलेली फटाके वाजवण्याची प्रथा बंद केली आहे. फटाके वाजवल्याने देवतांचे विडंबन होते, या संदर्भात या मंदिराच्या गणेश मंडळाचे सभासद इतरांनाही सांगतात. येणार्‍या भाविकांना श्रीगणेश पूजाविधीचे महत्त्व समजून त्याप्रमाणे कृती होण्यासाठी येणार्‍या भाविकांना श्रीगणेश पूजाविधी हा ग्रंथ भेट दिला जातो. श्री गणेश मंदिरामध्ये चालू असलेले ‘सनातन प्रभात’ हे त्या मंदिरामध्ये येणार्‍या सर्व भाविकांना वाचनासाठी उपलब्ध करून दिले जाते. अथर्वशीर्ष अर्थ समजून म्हणण्यासाठी श्री गणेश अथर्वशीर्ष हा ग्रंथ भेट दिला जातो. श्री. रामदास जाधव यांचे या मंदिरामध्ये दैनिक चालू करण्यामध्ये नियमित सहकार्य असते. ते या मंदिराचे खजिनदार आहेत.

‘सनातन प्रभात’वर श्रद्धा असणार्‍या बचत गटाच्या सौ. माधुरी मामेडवार !

इंद्रायणीनगर, भोसरी (जिल्हा पुणे) येथील सौ. माधुरी अशोक मामेडवार या वैष्णवी बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. त्यांची दैनिक ‘सनातन प्रभात’वर नितांत श्रद्धा आहे. घरामध्ये त्यांच्या मुलांना किंवा यजमानांना कोणतीही अडचण आली, तर त्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संदर्भ सांगतात आणि घरातील सर्वांना भगवंताला शरण जाऊन त्याप्रमाणे कृती करण्याचा सल्ला देतात. त्या स्वत: दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचतात. त्यातील अनेक लेखांतील संदर्भ त्या बचत गटातील महिलांना सांगतात. उदा. संक्रांतील सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व त्यांनी बचत गटातील महिलांना सांगितले. तेव्हा या बचत गटातील सर्व सभासद महिलांनी एकत्र हळदी-कुंकू करून सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने, लघुग्रंथ हे संक्रातीला होणार्‍या हळदी-कुंकवाच्या प्रसंगी येणार्‍या महिलांना भेट म्हणून दिले.