‘आनंदी जीवनासाठी साधना’ प्रवचन उपक्रमासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

साधकांना सूचना

‘आनंदी जीवनासाठी साधना’ प्रवचन उपक्रमासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने सध्या ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावरील प्रवचनांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी पुढील प्रसारसाहित्याच्या कलाकृती नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

१. प्रवचनाचा घरोघरी प्रसार करण्यासाठी ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक

२. प्रवचनापूर्वी प्रसार करण्यासाठी ६ फूट × ४ फूट आकारातील फ्लेक्स फलक (प्रायोजकासह आणि प्रायोजकाविना)

३. प्रवचनाच्या वेळी व्यासपिठावर लावण्यासाठी ६ फूट × २ फूट आकारातील फ्लेक्स फलक

या प्रसारसाहित्यासाठी आवश्यकतेनुसार प्रायोजक मिळवून त्यांचा प्रसारासाठी सुयोग्य वापर करावा, असे सनातन संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.