पत्रकारांना संसद आणि अन्य क्षेत्रांत ५ टक्के राजकीय आरक्षण द्या ! – सादीक खाटीक

पत्रकारितेत राजकारण शिरल्यास निरक्षेप आणि सत्याभिमुख पत्रकारिता करता येईल का ? केवळ स्वार्थासाठी राजकीय आरक्षणाची मागणी करणारे कधीतरी जनहित साधतील का ?

सातारा, १५ जानेवारी (वार्ता.) – समाजाच्या भल्यासाठी जीव धोक्यात घालून कार्य करणारे पत्रकार, संपादक हेच समाजाचे खरे सेवक आहेत. त्यामुळे पत्रकारांना संसद, विधीमंडळ, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व प्रकारच्या धर्मादाय संस्था आदींमध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. यासाठी संपूर्ण देशभरात पत्रकार आणि संपादक यांना ५ टक्के राजकीय आरक्षण मिळावे, अशी मागणी पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादीक खाटीक यांनी केली.