राजस्थानात महिला आणि बालकल्याण विभागाने चालू केली ‘घुंघट हटाव’ मोहीम !

हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारकडून बुरखापद्धतीविषयी मात्र मौन !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष ! महिला आणि बालकल्याण विभागाने धाडस असेल, तर हिंदूंच्या प्रथांच्या विरोधात मोहीम चालू करण्याऐवजी मुसलमान महिलांना परिधान करावा लागणारा बुरखा आणि तीन तलाक या पद्धतींच्या विरोधात मोहीम राबवून दाखवावी !

जयपूर – राजस्थानच्या ग्रामीण भागांत महिलांमध्ये अजूनही डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आहे. ‘या प्रथेचे निर्मूलन करण्यात यावे’, असे विधान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केले होते. या पार्श्‍वभूमीवर महिला आणि बालकल्याण विभागाने महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘घुंघट हटाव’ मोहीम चालू केली आहे. या मासात होणार्‍या पंचायत निवडणुकीत मतदानासाठी येणार्‍या महिलांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा दूर सारावी, यासाठी त्यांना या मोहिमेच्या अंतर्गत उद्युक्त करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

या मोहिमेविषयी महिला आणि बालकल्याण विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, आमचे तळागाळातील कार्यकर्ते, महिला बचतगटांतील सदस्य आणि स्थानिक महिला प्रत्येक शुक्रवारी विविध विषयांवर बैठक घेत असतात. अशा बैठकांच्या एका शुक्रवारी ‘घुंघट’च्या सूत्रांवर चर्चा केली जाते. याचसमवेत राज्यातील जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीमध्येही ‘घुंघट हटाव’चा संदेश दिला जात आहे.