(म्हणे) ‘आता पाहूया की, माझे हात सशक्त आहेत कि ‘त्या’ हत्यार्‍याचे ?’

काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांची पाकमधून आल्यानंतर पंतप्रधानांवर नाव न घेता गरळओक

  • मणीशंकर अय्यर यांनी यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानमध्ये जाऊन भारतातील भाजप सरकारच्या विरोधात गरळओक केली आहे. अय्यर यांनीच मंत्री असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्ती अंदमान येथील त्यांच्या स्मारकावरून काढल्या होत्या. अशा व्यक्तीवर आता केंद्र सरकारने कठोर कारवाई करून तिला कारागृहात डांबले पाहिजे !
  • मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतर देशात ब्राह्मणांवर काँग्रेसवाल्यांनी आक्रमणे केली होती, तर इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर साडेतीन सहस्र शिखांच्या हत्याकांडाचा काँग्रेसवर आरोप आहे. अशांना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?

नवी देहली – मी जे काही करू शकतो ते करण्यास मी सिद्ध आहे. जे काही बलीदान द्यायचे असेल, त्यामध्येही सहभागी होण्यास मी सिद्ध आहे. आता पाहूया की, कोणाचे हात सशक्त आहेत ? माझे कि ‘त्या’ हत्यार्‍याचे ?, असे विधान काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केले. येथील शाहीन बागमध्ये गेल्या एक मासापासून धर्मांध सुधारित नागरिकत्व कायदा (सी.ए.ए.) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. यामुळे येथील रस्ता बंद आहे. (एक मास रस्ताबंद आंदोलन केले जाते आणि पोलीस अन् प्रशासन झोपा काढत आहेत का ? असे आंदोलन हिंदूंच्या संघटनांना एक घंटातरी पोलिसांनी करू दिले असते का ? धर्मांधांसमोर नेहमीच शेपूट घालणारे आणि मार खाणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक) या आंदोलकांना भेटण्यासाठी १४ जानेवारीला काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर गेले होते. त्या वेळी ते बोलत होते. ‘सबका साथ सबका विकास’ असे वचन देऊन ते सत्तेत आले; परंतु त्यांनी ‘सबका साथ सबका विनाश’ केला’, अशी टीकाही त्यांनी केली. याच्या एक दिवस पूर्वीच अय्यर पाकच्या लाहोर शहराला भेट देऊन परत आले होते. (यावरून मणीशंकर अय्यर यांचा बोलविता धनी कोण आहे, हे राष्ट्रप्रेमींना वेगळे सांगायला नको ! – संपादक)

अय्यर यांनी वर्ष २०१७ च्या गुजरातमधील निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांना  ‘नीच आदमी’ असे संबोधले होते आणि नंतर त्यांना क्षमाही मागावी लागली होती.