नौदलाची समुद्री क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यामागे योगाचा हात ! – अमेरिकी नौदलाचे योगाविषयीचे ‘ट्वीट’

  • भारतातील पुरो(अधो)गामी, तथाकथित बुद्धीवंत आणि धर्मांध यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • हिंदूंच्या प्राचीन परंपरेविषयी जे अमेरिकेला कळते, ते भारतातील पुरो(अधो)गाम्यांना कळेल तो सुदिन !

न्यूयॉर्क – नौदलाने समुद्री क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यामागे, तसेच नौसैनिकांना त्यांचे मन आणि शरीर यांचा योग्य वापर करण्यामध्ये योगाचा हात आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?, अशा आशयाचे ‘ट्वीट’ अमेरिकी नौदलाने योगाविषयी केले आहे.

अमेरिकी नौदलाने त्याच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून एक छायाचित्र प्रसारित केले आहे. त्यामध्ये नौसैनिक युद्धनौकेमध्ये योगासने करतांना दिसत आहेत. वर्ष २०१८ मध्ये एका योगा पुस्तिकेमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार अमेरिकी संरक्षण दलातील कर्मचार्‍यांच्या मानसिक आणि शारीरिक समस्या दूर करण्यामध्ये योगाची भूमिका महत्त्वाची आहे, असे नमूद करण्यात आले होते.