इंग्लंडमध्ये ‘पवित्र स्नाना’नंतर तरुणींवर बलात्कार करणारा पाद्री दोषी

अशा घटनांविषयी भारतीय प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी, लेखक आदी नेहमीच मौन बाळगतात आणि हिंदूंच्या संतांवर टीका करतात !

लंडन (इंग्लंड) – अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुली यांच्यावर बलात्कार करणार्‍या मिशेल ओलुरोनबी या पाद्रयाला इंग्लंडच्या बर्मिंघम क्राऊन न्यायालयाने दोषी ठरवले. मिशेल याला काही दिवसांनंतर शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्याने १५ बलात्कार आणि हिंसेची ९ कृत्ये केली होती. मिशेल बलात्कारापूर्वी तरुणींना ‘पवित्र स्नान’ करण्यास सांगत असे. तो या तरुणींना अनिष्ट शक्तींपासून मुक्त करण्याचे आमीष दाखवून त्यांच्यावर बलात्कार करत होता. यामुळे ४ मुली गरोदरही राहिल्या होत्या. त्यांचा मिशेल याने गर्भपातही केला होता. मिशेल याने धर्माच्या आधारे एक गट बनवला होता आणि त्यात सहभागी होणार्‍या तरुणींचे तो लैंगिक शोषण करत होता.