सत्या यांच्या विधानातील सत्य !

संपादकीय

अमेरिकेतील ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) सत्या नडेला यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात विधान केल्याचे वृत्त भारतीय प्रसारमाध्यमांनी (बहुतांश सदैव डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असतात) रंगवून दिले. भारतातील डाव्यांनीही त्यांची बाजू लगेच उचलून धरली आहे. या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात बेंगळुरूमध्ये अटक झालेले इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी लगेच त्यांचे कौतुक केले आहे. अमेरिकेतील एका वृत्तपत्राच्या बेन स्मिथ या संपादकाने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील विषयावर भाष्य केले. नडेला यांनी केलेले भाष्य योग्यरित्या वाचले, तर ते पूर्णतः एकांगी नसून समतोल साधणारे आहे (किंबहुना मोठ्या पदावरील व्यक्ती समतोल भाष्य करतात. ‘मायक्रोसॉफ्ट आस्थापनाच्या संगणकीय प्रणाली जगभरातील सर्व धर्मियांच्या देशांत विकल्या जात आहेत’, हे ते जाणून आहेत.); मात्र भारतीय प्रसारमाध्यमांनी त्याला कायद्याच्या विरोधी रूप देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या संदर्भातील वृत्त प्रकाशित होऊ लागल्यावर काही वेळातच मायक्रोसॉफ्ट आस्थापनाच्या अधिकृत ट्विटरवरून हा विषय स्पष्ट करणारी विधाने प्रसारित झाली. त्यात नडेला यांनी म्हटले आहे, ‘प्रत्येक देशाने त्याच्या सीमा निश्‍चित केल्या पाहिजेत. राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देऊन स्थलांतरितांविषयीचे धोरण निश्‍चित केले पाहिजे. लोकशाही असणार्‍या देशांमधील सरकारे आणि जनता याविषयी चर्चा करून त्याची धोरणे ठरवतात.’ ‘मायक्रोसॉफ्ट आस्थापनाच्या अधिकृत ट्विटरवरून त्यांना तत्परतेने त्यांची विधाने काहीशी सुस्पष्ट कराविशी वाटली’, यातच सर्व काही आले. यातून अमेरिका आणि भारत दोन्ही देशांतील प्रसारमाध्यमांतील त्रुटीही अप्रत्यक्षरित्या उघड झाल्या आहेत.

नडेला यांच्यातील भारतीयत्वाची ओळख

नडेला यांच्या या भाष्यातून काही सूत्रे आपसूकच सिद्ध होत आहेत. त्यांनी म्हटले आहे, ‘मी भारताच्या बहुविध संस्कृती एकत्र असलेल्या ठिकाणाहून आलो आहे.’ यातून हे आपोआपच सिद्ध होते की, भारतात कोणावरही अन्याय न होता; बहुविध संस्कृती मोठ्या प्रमाणात एकत्र नांदत आहेत. त्यामुळे ‘ज्या कोणाला येथे तथाकथित ‘भीती वाटते’ ती किती खोटी आहे’, हेही यातून लक्षात येते. त्यांची बाजू उचलणार्‍या डाव्यांनी याचीही नोंद घ्यावी. ‘बहुसंख्य हिंदूंच्या देशातच अशी बहुविध संस्कृती सुखाने नांदते’, हेही यात अध्यारूढ आहेच. त्यांनी म्हटले आहे, ‘लहानपणापासून आम्ही ख्रिसमस आणि दिवाळी दोन्ही सण मोठ्या प्रमाणात साजरे करायचो.’ हिंदूंच्या अशा सर्वसमावेशक मानसिकतेमुळे ते ख्रिस्ती संस्कृतीचा अंगीकार करण्यात पूर्णतः डुबले आहेत. याचा अपलाभ उठवला गेल्याने प्रतिदिन भारतात लक्षावधींच्या संख्येने ख्रिस्तीकरण होत आहे आणि पूर्वांचल तर ख्रिस्तीबहुलच झाला आहे.

नडेला यांनी म्हटले आहे, ‘मी एका अशा भारताची आशा करतो, जिथे स्थलांतरित झालेली व्यक्ती उद्योग चालू करेल किंवा तेथील भारतीय समाज आणि अर्थव्यवस्था यांना लाभ मिळवून देणार्‍या एका बहुराष्ट्रीय आस्थापनाचे नेतृत्व करील.’ येथे सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, आज जगप्रसिद्ध असलेल्या टाटा समूहाचे पूर्वज हे एकेकाळी भारताबाहेरूनच देशात आले आणि आज त्यांनी जगप्रसिद्ध आस्थापने उभारून यशाचे शिखर गाठले; परंतु येथे महत्त्वाचे म्हणजे त्यांचे पूर्वज भारतीय संस्कृतीशी एकरूप झाले; भारतीय संस्कृतीत इतके सहजपणे मिसळून गेले की, ते कधी परके वाटलेच नाहीत. त्यांनी भारतियांना ओरबाडून त्यांच्यावर अत्याचार केले नाहीत. येथे बांगलादेशी धर्मांध घुसखोर भारतीय संस्कृतीत मिसळणे तर सोडाच; उलट अक्षरशः सर्व प्रकारची जिहादी कृत्ये, गोतस्करी आणि ‘लव्ह जिहाद’ आदी करण्यातच अग्रेसर आहेत. तरीही त्यांना गोंजारून पोसणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्यांना कोणाला योग्य वाटते, त्यांची मानसिकता राष्ट्रघातकी नाही का ?

पुढील प्रसंगातून नडेला यांचे व्यक्तीमत्त्व आणि विचारसरणी लक्षात येते. अनेक वर्षांपूर्वी त्यांना या आस्थापनाच्या मुलाखतीत विचारण्यात आले, ‘‘तुम्हाला रस्त्यात रडणारे लहान मूल दिसले, तर तुम्ही काय कराल ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘मी पोलिसांना बोलावीन.’’ त्यांना ती नोकरी मिळाली; परंतु ते उत्तर अयोग्य वाटलेल्या आणि दारापर्यंत सोडायला आलेल्या व्यवस्थापकांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही प्रथम त्या लहान मुलाला उचलून घ्यायला पाहिजे; कारण कितीही मोठ्या पदावर गेलो, तरी सहानुभूती जपली पाहिजे.’’ या पार्श्‍वभूमीवर नडेला यांना ‘सी.ए.ए.’ कायद्याचा लाभ लक्षावधी शरणार्थी हिंदु पीडितांना होणार आहे, हे ठाऊक नाही’, असे म्हणणे योग्य होणार नाही; परंतु ‘भारतात दंगे करणारे बांगलादेशी धर्मांध घुसखोरही ‘पीडित’ कसे वाटले ?’, असा प्रश्‍न पडतो.

वैचारिक खंडण आवश्यक !

काही धर्मांध अधिवक्ते ‘हा कायदा मागासवर्गियांच्या विरोधातील आहे’, असेही पसरवत आहेत. एके ठिकाणी कायद्याविरुद्धच्या आंदोलनासाठी आलेल्या धर्मांधांनी ‘भाववाढीसाठी आंदोलन करत’ असल्याचे वाहिन्यांवर सांगितले. इतकी पराकोटीची अनभिज्ञता आहे. असे असतांना वलयांकित व्यक्तींमध्ये मात्र कायद्याला विरोध करण्याची म्हणजेच राष्ट्रघातकी विधाने करण्याची जणू टूम निघाली आहे. त्यातही ते त्यांचा स्वार्थ पाहत आहेत, असो ! राष्ट्रभक्त हिंदूंनी मात्र सजग राहून कायद्याच्या समर्थनार्थ वैचारिक खंडण करत राहिले पाहिजे.