.‘फोन पे’ अ‍ॅपद्वारे पोलिसाचेच सव्वादोन लाख रुपये चोरले

मुंबई – पोलीस कर्मचारी वसंत माळी यांच्या चोरीला गेलेल्या भ्रमणभाषमधील ‘फोन पे’ अ‍ॅपचा वापर करून सव्वादोन लाख रुपये काढण्यात आले आहेत. या प्रकरणी डोंगरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

माळी खरेदीला गेले असतांना त्यांचा मित्र समवेत होता. त्या वेळी त्यांचा भ्रमणभाष चोरीला गेला. त्यानंतर ते गावी गेले. आल्यावर खोलीमध्ये राहणार्‍या खरेदीच्या वेळी समवेत असणार्‍या सहकार्‍याने त्यांना भ्रमणभाष आणून दिला; परंतु त्यातील ‘फोन पे’ अ‍ॅप ‘डिलीट’ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हे अ‍ॅप पुन्हा ‘डाऊनलोड’ केले असता त्याद्वारे ‘अ‍ॅक्सिस’ बँकेच्या खात्यातून १ लाख ४६ सहस्र आणि ‘बँक ऑफ इंडिया’च्या खात्यातून ७१ सहस्र रुपये काढल्याचे निदर्शनास आले.