सद्गुरु सिरियाक वाले यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

१. ‘स्वतःचे स्थूल शरीर आणि स्वतःचे अस्तित्व वेगळे आहे’, असे जाणवणे

‘मला अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी युरोपला जायचे होते. २७.४.२०१९ या दिवशी मला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी साधनेसंदर्भात बोलायचे होते; म्हणून मी त्यांच्याकडे बोलायला गेलो. त्या वेळी त्या अन्य एका साधकाशी बोलत असल्यामुळे मी नामजप करत होतो. तेव्हा ‘माझे स्थूल शरीर आणि माझे अस्तित्व दोन्ही भिन्न आहेत. माझे अस्तित्व रामनाथी आश्रमातच जाणवणार असून मी कुठेही जाणार नाही’, असे काही क्षण मला जाणवले.

२. त्यानंतर रामनाथी आश्रमात श्रीविष्णु याग करण्यात आला. यज्ञ चालू असतांना मी नामजप करत होतो. त्या वेळी ‘मी सर्वांमध्ये विलीन झालो आहे. सर्व सृष्टी म्हणजेच श्रीविष्णु आहे आणि मी त्याच्याशी एकरूप झालो आहे’, असे मला जाणवले.’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (२८.४.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक