सेवा आपोआप होत असल्यासंदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. रिशिता गडोया यांना आलेल्या अनुभूती !

सौ. रिशिता गडोया

१. ‘सेवेचा ताण न येता सेवा सहजतेने होते’, असे जाणवणे

अलीकडे ‘मी सेवा करतच नाही. त्या आपोआप पूर्ण होत आहेत’, असे मला अनुभवायला येते. एकदा मी रुग्णाइत होते. मला थोडे बरे वाटल्यावर मी आश्रमात सेवेसाठी गेले. तेव्हा ‘दिवसभरात मी काहीच सेवा केली नाही’, असे मला वाटत होते; परंतु रात्री मी आढावा घेतल्यावर ‘अनेक सेवा पूर्ण झाल्या आहेत’, असे माझ्या लक्षात आले. ‘सर्वकाही सहजतेने होत असून सेवा करणे अतिशय सोपे आहे’, असे मला जाणवत होते. मी सेवा करत होते; परंतु मला त्याचा ताण जाणवत नव्हता. ‘प्रत्यक्षात मी काहीच करत नाही’, असे मला जाणवत असले, तरी ‘मी त्यांना साहाय्य करते’, असे साधक मला सांगतात.

२. मी काहीही प्रयत्न न करताही ‘सर्व सेवा पूर्ण होत आहेत’, असे मला जाणवते.

३. ‘देवच सर्व सेवा करवून घेत आहे’, याची जाणीव होणे

‘एखादी सेवा कशी करावी ?’, याचा मी विचार करते. त्या वेळी त्याचे उत्तर मला कधी साधकांच्या माध्यमातून, तर कधी आतूनच मिळते आणि सेवा पूर्ण होतात. असे बर्‍याचदा होते. ‘देवच सर्व सेवा करवून घेत असल्यामुळे त्या करणे अवघड नाही’, असे मला अनुभवायला येते. मी जितकी अधिक सेवा करते, तितके ‘मी करते’, ही जाणीव अल्प असते.’

– सौ. रिशिता गडोया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१९)

सेवेच्या माध्यमातून साधकांची साधना करवून घेणारे आदर्श सद्गुरु सिरियाक वाले !

१. ‘सद्गुरु सिरियाक वाले यांनी मला ‘सेवा कशी करावी ?’, हे शिकवले. ‘प्रत्येक सेवा समजून घेण्यासाठी प्रथम ती सेवा स्वतः करावी. असे केल्यानेच आपण त्याविषयी इतरांना साहाय्य करू शकतो’, हे सद्गुरु सिरियाकदादांनी मला त्यांच्या कृतीतून शिकवले.

२. ‘प्रत्येक परिस्थितीत तिच्या (परिस्थितीच्या) सर्व बाजू कशा पाहाव्यात ?’, याविषयी सद्गुरु सिरियाकदादांनी मला मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ‘‘परिस्थितीच्या संदर्भात आढावा देण्यापूर्वी किंवा त्यात येणार्‍या अडचणींविषयी इतरांचे साहाय्य घेण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’’

३. सद्गुरु सिरियाकदादा आदर्श आहेत. ते ‘सेवा कशा कराव्यात आणि सेवेच्या माध्यमातून आपली साधना कशी होईल ?’, याचे एक आदर्श उदाहरण आहेत.’

– सौ. रिशिता गडोया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक