गुढीपाडवा’ या हिंदूंच्या नववर्ष दिनानिमित्त आप्तांना सात्त्विक शुभेच्छापत्रे देता यावीत, यासाठी स्थानिक वितरकांकडे आपली मागणी १५.१.२०२० या दिवसापर्यंत नोंदवा !

सर्वत्रच्या हितचिंतकांना नम्र विनंती !

‘२५.३.२०२० या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा नववर्षदिन ! या निमित्ताने बरेच जण आपले आप्तेष्ट, परिचित, स्नेही आदींना, तसेच काही व्यावसायिक त्यांचे ग्राहक आणि कर्मचारी यांना शुभेच्छापत्रे पाठवतात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सात्त्विक आणि बोधप्रद लिखाण असलेले सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे शुभेच्छापत्र इतरांना देता येईल.

१. शुभेच्छापत्रांची वैशिष्ट्ये !

ही शुभेच्छापत्रे मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांत आहेत. सात्त्विक चित्रे, तसेच धर्मशिक्षण देणारे लिखाण ही या शुभेच्छापत्रांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. यामुळे अधिकाधिक जणांपर्यंत राष्ट्र, धर्म आणि साधना हे विषय पोचतील.

२. शुभेच्छापत्रांच्या खरेदीवर सवलत उपलब्ध !

एका शुभेच्छापत्राचे वितरण मूल्य १२ रुपये असून अधिक संख्येत शुभेच्छापत्रे खरेदी केल्यास पुढील सवलत देण्यात येईल.

इतरांना देण्यासाठी २५० वा त्यापेक्षा अधिक शुभेच्छापत्रे हवी असतील, तर त्या सर्व शुभेच्छापत्रांवर ‘…… यांच्याकडून शुभेच्छा !’ अशा आशयाचे लिखाण छापून देता येईल. अशा शुभेच्छापत्रांवर वरील सवलत उपलब्ध नसेल.

हितचिंतकांनी या शुभेच्छापत्रांची मागणी १५.१.२०२० या दिनांकापर्यंत स्थानिक साधक किंवा वितरक यांच्याकडे करावी. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ९३२२३१५३१७ या क्रमांकावर संपर्क करावा.

बांधवांनो, हिंदूंच्या नववर्षानिमित्त आप्तांना शुभेच्छापत्र देऊन आणि हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगून हिंदु राष्ट्राच्या दिशेने पाऊल टाका !

साधकांसाठी सूचना

जिल्ह्यातील वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करून गुढीपाडव्याच्या निमित्ताने द्यावयाच्या शुभेच्छापत्रांची मागणी घ्यावी.