इतुके करी रे देवराया ।

साधकांना भावावस्थेची अनुभूती देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘१५.६.२०१८ या रात्री १.३० वाजता मला शारीरिक आणि मानसिक त्रासांमुळे झोप येत नव्हती; म्हणून मी माझा तळहात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड १’ या ग्रंथावर ठेवला. तेव्हा मला सुचलेले प्रार्थनारूपी काव्यपुष्प गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे. हे काव्य सुचल्यानंतर पहाटे ५ वाजेपर्यंत मी भावावस्थेतच होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले
सौ. विमल माळी

शरण आले मी श्री गुरुनाथा । चरणी ठेवूनिया माथा ।
सांभाळी गा या नाथा । दूर करी भवसागर व्यथा ॥ १ ॥

मागणे हे एकची आता । रूप तुझे राहो मम चित्ता ।
झणी सोडवी हा जीवात्मा । तू परमदयाळू परमात्मा ॥ २ ॥

तव साकडे घालिते पाया । जन्म नको व्यर्थ जाया ।
तन-मन झिजू दे धर्मकार्या ।
इतुके करी देवराया, इतुके करी रे देवराया ॥ ३ ॥’

– सौ. विमल माळी, चाळीसगाव, जिल्हा जळगाव. (१५.६.२०१८)

• या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक