‘श्री सिद्धीविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे

पौष कृष्ण पक्ष तृतीया (१३ जानेवारी २०२०) या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. त्यानिमित्ताने…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठापना करण्यात आलेली श्री सिद्धीविनायक मूर्ती

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

डॉ. अमित भोसले

‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी यासाठी मयन महर्षींच्या आज्ञेने ९.१०.२०१९ आणि १०.१०.२०१९ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते श्री सिध्दीविनायक मूर्तीची चैतन्यमय अन् भावपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘श्री सिद्धीविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत पुढील घटकांच्या प्रतिष्ठापना विधीपूर्वी आणि विधीनंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

अ. श्री सिद्धीविनायक मूर्तीची शय्या

आ. हळदीचा गणपति (मयन महर्षींनी सांगितल्यानुसार ९.९.२०१९ या दिवशी विधींच्या प्रारंभी हळदीपासून गणपति बनवून त्याची पूजा करण्यात आली.)

इ. प्रतिष्ठापना विधीअंतर्गत पूजण्यात आलेले ३ कलश : ‘निद्रा कलश’, ‘वास्तू कलश’ आणि ‘संपात कलश’

ई. ‘श्‍वेत गणपति’चे छायाचित्र

उ. पुरोहित

या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. प्रतिष्ठापना-विधीनंतर पुरोहितांमधील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होणेेे

टीप – पुरोहितांमधील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा तिची प्रभावळ मोजता न येण्याइतपत न्यून झाली. त्यावेळी पुरोहितांच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’ने १६० अंशाचा कोन केला. (‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.)

२ अ २. चाचणीतील अन्य घटकांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. प्रतिष्ठापना-विधीनंतर पुरोहितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : पुरोहितांमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा नव्हती. प्रतिष्ठापना-विधीनंतर त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि तिची प्रभावळ ३.२८ मीटर होती.

२ आ २. प्रतिष्ठापना-विधीनंतर चाचणीतील अन्य घटकांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

२ इ. एकूण प्रभावळीच्या (ऑरा) (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा नमुना म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची एकूण प्रभावळ मोजतात.

 सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. गणेशमूर्ती प्रतिष्ठापना विधीनंतर चाचणीतील सर्व घटकांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

 वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ‘३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. प्रतिष्ठापना विधीतून वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे : ‘श्री सिद्धीविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’साठी मयन महर्षींचा संकल्प कार्यरत होता. साधकांनी विधीसाठीची सर्व सिद्धता भावपूर्ण केली होती. सद्गुरुद्वयींनी ‘श्री सिद्धीविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’ अतिशय भावपूर्ण केल्याने प्रतिष्ठापना विधीतून वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित झाले.

३ आ. सद्गुरुद्वयींनी केलेल्या भावपूर्ण पूजनामुळे श्री सिद्धीविनायक मूर्तीतील श्री गणेशतत्त्व जागृत होऊन ते कार्यरत होणे : सद्गुरुद्वयींनी केलेल्या भावपूर्ण पूजनामुळे श्री सिद्धीविनायक मूर्तीतील श्री गणेशतत्त्व जागृत होऊन ते कार्यरत झाले. प्रतिष्ठापना विधीतील घटकांवर (श्री सिद्धीविनायक मूर्तीची शय्या, हळदीचा गणपति, ‘श्‍वेत गणपति’चे छायाचित्र आणि विधीतील तिन्ही कलश यांच्यावर) पुष्कळ सकारात्मक परिणाम झाल्याने घटकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत विधीनंतर पुष्कळ वाढ झाली.

३ इ. पुरोहितांनी प्रतिष्ठापना विधीतून निर्माण झालेले चैतन्य त्यांच्या क्षमतेनुसार ग्रहण केल्याने त्यांना आध्यात्मिक लाभ होणे : पुरोहितांनी प्रतिष्ठापना विधीतून निर्माण झालेले चैतन्य त्यांच्या क्षमतेनुसार ग्रहण केल्याने त्यांना ‘त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होणे, त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि त्यांची एकूण प्रभावळ वाढणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.

थोडक्यात, ‘श्री सिद्धीविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधीचा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ (‘यू.टी.एस्.’) उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

– डॉ. अमित भोसले, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३१.१०.२०१९)

ई-मेल : [email protected]

हिंदु धर्मातील चालीरीती, प्रथा-परंपरा, कर्मकांड आदींना थोतांड म्हणून त्यांना हिणवणार्‍या तथाकथित पुरो(अधो)गाम्यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेल्या वैज्ञानिक प्रयोगांतून समोर आलेल्या निष्कर्षांविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत