आंध्रप्रदेशमध्ये मकरसंक्रांतीच्या काळात प्रवासी भाड्यामध्ये ५० टक्क्यांनी वाढ

  • गोव्यातील पोर्तुगिजांच्या राजवटीमध्ये ख्रिस्ती प्रशासकांनी हिंदूंची पिळवणूक केली. ख्रिस्ती मुख्यमंत्री असलेल्या आंध्रप्रदेशमध्ये हिंदूंची अशीच पिळवणूक चालू आहे, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ?
  • वाय.एस्.आर्. काँग्रेसचे सरकार ख्रिस्त्यांना जेरूसलेमला जाण्यासाठी अनुदान देते, तर हिंदूंच्या सणांच्या काळात प्रवासी भाड्यात वाढ करते. हा हिंदुद्वेष नव्हे, तर दुसरे काय आहे ? केवळ आंध्रप्रदेशच नव्हे, तर भारतभरातील हिंदूंनी संघटित होऊन आंध्रप्रदेश सरकारला हा निर्णय पालटण्यासाठी वैध मार्गाने भाग पाडले पाहिजे !
  • कट्टर ख्रिस्ती असलेले मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा हिंदुद्वेष सर्वज्ञात आहे, तसेच त्यांचे वडील वाय. सॅम्युअल राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री असतांना त्यांनी केलेल्या हिंदुविरोधी कारवायाही सर्वज्ञात आहेत. असे असतांनाही आंध्रप्रदेशातील हिंदू अशांना निवडून देतात. त्यामुळे तेथील सरकारच्या हिंदुविरोधी निर्णयांमुळे हिंदूंना त्रास सहन करावा लागणे, ही तेथील हिंदूंना मिळालेली शिक्षाच होय !
  • ‘धर्म घरात ठेवा, सार्वजनिक ठिकाणी आणू नका’, असा हिंदूंना फुकाचा सल्ला देणारी पुरो(अधो)गामी मंडळी ‘निधर्मीवादी’ म्हणवणारे सरकार असे निर्णय घेत असतांना कोणत्या बिळात जाऊन लपून बसतात ?

भाग्यनगर (आंध्रप्रदेश) – येथील प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या काळात भाविकांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये; म्हणून ठिकठिकाणी जाण्यासाठी अधिक बसगाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे; मात्र त्यासाठी प्रवासीभाड्यामध्ये ५० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. गतवर्षीही अशाच प्रकारे भाडेवाढ करण्यात आली होती. राज्य परिवहन खात्याने घेतलेल्या या भाडेवाढीच्या निर्णयामुळे लाखो भाविकांना आर्थिक फटका बसणार आहे. ‘हा निर्णय म्हणजे धार्मिक पक्षपात असून हिंदूंच्या धार्मिक उत्सवावर जाणीवपूर्वक बंधने आणण्याचा प्रकार आहे’, अशी भावना हिंदु समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदूंकडून ‘सरकारने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली दरवाढ तातडीने मागे घ्यावी. या धार्मिक उत्सवांच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात’, आदी मागण्या करण्यात येत आहेत. (हिंदूंबहुल देशातील हिंदूंना सरकारकडे अशी मागणी करावी लागणे, यासारखे दुर्दैव ते कोणते ? हिंदूंना मानाने त्यांचे सण साजरे करता यावेत, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक)