(म्हणे) ‘मोदी सरकारकडून मुसलमानांना किड्या-मुंग्यांसारखी वागणूक !’

ऑल इंडिया डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांचा थयथयाट !

धर्मांधांना कितीही चुचकारले, तरीही ते समाधानी नसतात आणि कांगावाच करतात, हे लक्षात घ्या !

धर्मांधांनी केलेल्या कृत्यांना विरोध होऊ लागल्यावर धर्मांध संघटनांचे नेते कशा प्रकारे थयथयाट करतात, याचे हे उदाहरण होय ! अशी विधाने करून धर्मांधांची डोकी भडकावणार्‍यांवर प्रथम कारवाई करणे आवश्यक !

नवी देहली – उत्तरप्रदेशसह देशातील अन्य भागात अलीकडच्या घटना पाहिल्यास लक्षात येईल की, पोलिसांना आंदोलकांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले जात आहेत; मात्र त्यानंतर त्यांना याविषयीही विचारले जात नाही. (धर्मांधांनी हिंसक आंदोलने करायची, तसेच पोलिसांवर आक्रमण करायचे; मात्र पोलिसांनी काहीही करायचे नाही, असे अजमल यांना वाटते का ? – संपादक) याउलट त्यांचे कौतुक केले जात आहे. भाजप सरकारच्या काळात मुसलमानांना माणसांसारखी वागणूक न देता त्यांना किड्या-मुंग्यांसारखी वागणूक दिली जात आहे. भाजप सरकारच्या काळात मुसलमानांना भारतीय नागरिक समजले जात नाही, असे वक्तव्य ऑल इंडिया डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपने सर्व ठिकाणी हिंदु आणि मुसलमान यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे; मात्र त्यांचे हे धोरण अधिक काळ चालेल, असे मला वाटत नाही.