पाकला तस्करीमध्ये साहाय्य करणार्‍या भारतीय सैनिकाला अटक !

ड्रोन, काडतुसे, अमली पदार्थांसह रोख रक्कम कह्यात

  • शत्रूराष्ट्राला साहाय्य करणार्‍या सैनिकांवर तात्काळ कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. यावरून सैनिकांना सैनिकी प्रशिक्षणासह नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे, हेच दिसून येते !
  • सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्‍या पाकच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने त्याच्या विरोधात कठोर पाऊले उचलणे आवश्यक !

चंडीगड – भारत-पाकिस्तान सीमेवरून ‘जीपीएस्’ आधारित ड्रोनच्या साहाय्याने  अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी एका भारतीय सैनिकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या वेळी आरोपींकडून चिनी बनावटीचे २ ड्रोन्स, १२ ड्रोन बॅटरी, ड्रोन कंटेनर, ‘इन्सास’ रायफल काडतुसे, २ वॉकी-टॉकी संच, मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ यांसह ६ लाख २२ सहस्र रुपये कह्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली.

या वेळी गुप्ता यांनी सांगितले की, भारतीय सैन्यात नायक हुद्यावर असलेल्या राहुल चौहान यांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीसह पिस्तूल आणि अन्य छोट्या शस्त्रांची तस्करी ड्रोनने झाली असावी, असा संशय आहे. राहुल चौहान ड्रोनची खरेदी करण्यासह त्याच्या वापराचेही प्रशिक्षण देत होते.