पाकमध्ये अपहरण करून धर्मांतर करण्यात आलेल्या शीख तरुणीचा घरी परत जाण्यास नकार

धर्मांधांच्या दबावामुळेच शीख तरुणीने हा नकार दिला असणार, हे वेगळे सांगायलाच नको ! हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील ननकाना साहिब येथील गुुरुद्वाराच्या ग्रंथीच्या मुलीचे दुसर्‍यांदा अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आले आणि नंतर महंमद हसन याने पुन्हा तिच्याशी विवाह केला. या प्रकरणी न्यायालयात खटला चालू झाल्यावर न्यायालयाच्या अनुमतीने तिचा मोठा भाऊ मनमोहन सिंह याने तिची भेट घेतली. यानंतर तिने न्यायालयाला सांगितले की, मी स्वेच्छेने धर्मांतर केले असून हसनशी विवाह केला आहे. मी आता आई-वडिलांकडे जाऊ इच्छित नाही. यावर तिच्या भावाने न्यायालयाला म्हटले की, ती फार तणावामध्ये असून तिला तिचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ द्यायला हवा.

याच मुलीच्या अपहरणानंतर शिखांनी विरोध केल्यावर ननकाना साहिब गुरुद्वारावर येथील मुसलमानांनी दगडफेक केली होती.