(म्हणे) ‘भारत-पाक यांच्यातील विनाशकारी युद्ध रोखण्यासाठी निर्णायक पावले उचला !’ – पाकचा संयुक्त राष्ट्रांकडे थयथयाट

भारत पाकला आता प्रत्युत्तर देण्याच्या सिद्धतेत असल्याचे दिसू लागल्यावर पाक स्वतःचा बचाव करू शकत नसल्यानेच तो आता अशी विनंती करू लागला आहे, हे लक्षात येते ! मात्र पाक नावाची डोकेदुखी कायमची नष्ट करण्यासाठी पाकला धडा शिकवणे अपरिहार्य आहे !

न्यूयॉर्क – भारत आणि पाक यांच्यातील विनाशकारी युद्ध रोखण्यासाठी निर्णायक पावले उचलावीत, अशी मागणी पाकचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत मुनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आणि सरचिटणीस यांच्याकडे केली. अक्रम पुढे म्हणाले, ‘‘भारताकडून आमच्यावर आक्रमण करण्याचे संकेत मिळत आहेत. भारताने काश्मीरच्या नकाशामध्ये पाकच्या कह्यातील काश्मीर आणि गिलगिट अन् बाल्टिस्थान दाखवले आहे. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी या प्रांतावर नियंत्रण मिळवण्याविषयीचे विधान केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होणारे मानवाधिकारांचे घोर उल्लंघन रोखून काश्मिरी लोकांना त्यांचा आत्मनिर्णयाचा अधिकार देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करावेत.’’