वर्ष २०१८ मध्ये महाराष्ट्रात ३५ सहस्र ७१७ अपघात

परवाना नसतांना वाहन चालवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. यासह व्यक्तीला परवाना देतांना ती खरोखरच पात्र आहे का, हेही पाहायला हवे !

मुंबई – वर्ष २०१८ मध्ये विनापरवाना चालकांकडून १ सहस्र ६१६ अपघात घडले असून यात ६०२ जणांचा मृत्यू झाला. या कालावधीत राज्यात ३५ सहस्र ७१७ अपघात झाले असून त्यामध्ये १२ सहस्र ९८ जणांचा मृत्यू झाला. या अपघातांमध्ये १२ सहस्र ६४८ जण गंभीर घायाळ, तर ६ सहस्र ५८५ जण किरकोळ घायाळ झाले. यामध्ये शिकाऊ वाहन परवाना चालकांकडून १ सहस्र ९१ अपघात होऊन त्यामध्ये ३६९ जणांचा मृत्यू झाला आहे.