वेळेचे महत्त्व जाणून तळमळीने सेवा करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रेरणा पाटील !

१. उत्साही

कु. प्रेरणा पाटील

‘प्रेरणाकडे पाहिल्यावर मला पुष्कळ उत्साह वाटतो. मला कधी थकवा असतांना सेवा करायला शक्य होत नसल्यास अन् त्या वेळी प्रेरणा समोरून गेल्यावर तिला पाहून ‘प्रेरणा वयाने लहान असूनही प्रत्येक कृती आनंदाने करते, तर आपणही तसे करूया’, असे मला वाटते.

कु. शांता जंगम

२. ती फार समंजस आहे. ती लहान असूनही तिच्या वागण्यात नीटनेटकेपणा आहे.

३. ती कोणाशी अनावश्यक बोलत नाही. ती वेळ वाया घालवत नाही.

४. प्रेमभाव

तिच्याकडे कधी खाऊ वाटण्याची सेवा असते. त्या वेळी तिला ‘तू खाऊ घेतलास का ?’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘सगळ्यांना देऊन मग घेते.’’

५. आसक्ती नसणे

तिला खाण्या-पिण्याची किंवा अन्य वस्तूंची आसक्ती नाही.

६. सेवेची तळमळ

अ. ती सकाळी लवकर उठून वेळेत सेवेला येते. ती कुठेही सवलत घेत नाही. ती खोलीतही सेवा करते.

आ. सेवा झाल्यावर ती कधीच दमलेली दिसत नाही.

इ. भाजी चिरतांना काही वेळा तिच्या बोटाला जखम होते. तेव्हा ती ‘बँडेज’ पट्टी लावते आणि लगेच सेवा चालू करते. तिला ‘तुला जमेल का ?’, असे विचारल्यावर ती लगेच ‘हो’ म्हणते.

ई. एकदा प्रेरणा आणि मी मिरच्या स्वच्छ करण्याची सेवा करत होतो. मी हाताला तेल लावून मिरच्या स्वच्छ केल्या. प्रेरणाने हाताला तेल न लावताच मिरच्या पटापट स्वच्छ केल्या. मी तिला विचारले, ‘‘तुझ्या हातांना झोंबत नाहीत का ?’’तेव्हा ती ‘नाही’ म्हणाली. ‘ती वयाने मोठ्या आणि अनुभवी महिलांप्रमाणे सेवा करते’, हे पाहून मला तिचे पुष्कळ कौतुक वाटले.

७. कृतज्ञता

मी महाभारत आणि रामायण या मालिकांत ‘उच्च जीव कसे जन्माला येतात ?’, ते पाहिले होते. गुरुमाऊलीच्या कृपेमुळे ‘उच्च लोकातील जीव कसे आहेत आणि ते कसे सेवा करतात ?’, ते आम्हाला पाहायला मिळत आहे. आम्हा साधकांना त्यांच्या सान्निध्यात राहायला मिळत आहे. त्यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी शतशः प्रणाम !’

– कु. शांता जंगम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०१९)