आनंदी आणि नावाप्रमाणेच इतरांना साधना करण्यासाठी प्रेरणा देणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रेरणा पाटील !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. प्रेरणा पाटील ही एक आहे !

कु. प्रेरणा पाटील

१. आनंदी

कु. अस्मिता लोहार

‘प्रेरणा नेहमी आनंदी असते. ती इतरांनाही आनंद देते. तिच्याकडे पाहून मला वेगळाच आनंद मिळतो. तिच्याकडे पाहून मला एक प्रकारची प्रेरणा मिळते.

२. व्यवस्थितपणा

ती वयाने लहान असूनही व्यवस्थित आणि नीटनेटकी राहते.

३. ती सर्वांशी नम्रतेने बोलते.

४. जवळीक साधणे

ती सर्वांशी लगेच जवळीक साधते. ती बोलतांना आणि खेळतांना साधनेच्या स्तरावर बोलते. ती माझी आध्यात्मिक मैत्रीण आहे.

५. सेवाभाव

अ. ती प्रत्येक सेवा आनंदाने करते. तिला सेवेत आवड-निवड नाही.

आ. तिला एखादी सेवा सांगितल्यावर ती दायित्व घेऊन सेवा पूर्ण करते.

६. ध्येय गाठण्याचा ध्यास असणे

ती स्वतःच्या मनाला ध्येयाची जाणीव करून देते आणि त्याप्रमाणे प्रयत्नही करते. ती मला चुका विचारते. ती मला सांगते, ‘‘ताई, मला माझे ध्येय गाठायचे आहे.’’ ‘ती एवढ्या लहान वयात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवते’, हे पाहून मला उत्साह येतो.

७. तिचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.’

– कु. अस्मिता लोहार (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.११.२०१९)