‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ग्रामसभा, हिंदू अधिवेशने आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्कात येणार्‍या जिज्ञासू वृत्तीच्या धर्मप्रेमींना सनातन प्रभातचे जुने अंक वाचण्यासाठी द्या !

साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांना महत्त्वाची सूचना !

१. कार्यात सहभागी होण्यास इच्छुक धर्मप्रेमींसाठी सनातन प्रभात नियतकालिक हे मार्गदर्शक असणे

‘सध्या विविध जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ग्रामसभा, हिंदू अधिवेशने आयोजित केली जात आहेत. सर्वत्रच्या धर्मप्रेमींचा या कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. सभेला उपस्थित असलेले अनेक धर्मप्रेमी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात नियमितपणे सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, तर काही जण कार्याविषयी दिशादर्शन होण्यासाठी विचारणा करत आहेत. कार्यकर्त्यांनी अशा धर्मप्रेमींना सनातन प्रभात नियतकालिक अभ्यासण्यास सांगावे.

या नियतकालिकात हिंदु धर्मावर होणारे विविध आघात, ते रोखण्यासाठी करावयाच्या कृती, हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, धर्मशिक्षण आदी विविध विषयांवरील अमूल्य माहिती प्रसिद्ध होते. हिंदु धर्मरक्षणार्थ कार्य करण्यास इच्छुक असलेल्या धर्मप्रेमींना ती निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल.

२. ‘धर्मप्रेमींना नियतकालिके अभ्यासणे सुलभ जावे’, यासाठी साधक आणि कार्यकर्ते यांनी सनातन प्रभातचे जुने अंक साधकांकडून एकत्रित करावेत.

३. जिज्ञासा असलेल्या धर्मप्रेमींना कार्यक्रमाच्या प्रसाराच्या वेळी किंवा कार्यक्रमात काही जुने अंक वाचनासाठी द्यावेत !

या कार्यक्रमांचा प्रसार करतांना, कार्यक्रम पार पडल्यावर धर्मप्रेमी घरी परततांना वा कार्यक्रमानंतरच्या आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या जिज्ञासू वृत्तीच्या प्रत्येक धर्मप्रेमीला ४ – ५ अंक वाचनासाठी द्यावेत. त्यांना अंक देतांना ‘तुम्ही हे अंक वाचून पहा. त्यामुळे तुम्हाला अध्यात्म आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन मिळेल. हे अंक नंतर इतर धर्मप्रेमींना वाचण्यासाठी द्या आणि त्यांनाही ते अंक अन्य जिज्ञासूंना देण्यास सांगा. आम्ही तुम्हाला भेटायला येऊ’, असे सांगावे. त्यानंतर त्यांना भेटायला जावे. अंकातील लिखाण आवडल्यास नियमितपणे अंक मिळण्यासाठी त्यांना वाचक होण्यास प्रवृत्त करावे.

४. धर्मप्रेमींना अंक चालू करतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे

दैनिक वितरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो. नियतकालिकाच्या वितरणाची व्यवस्था नसल्यास जिज्ञासूंना पोस्टाद्वारे अंक पाठवता येईल. धर्मप्रेमींच्या भाषेचा विचार करून त्यांच्या सोयीनुसार संबंधित भाषेतील नियतकालिक चालू करावे. कार्यक्रम झाल्यानंतर १० ते १५ दिवसांत सर्वांना अंक चालू होईल, असे पहावे.

सनातन प्रभातच्या नूतन संकेतस्थळावरून वाचक बनण्यास इच्छुक असलेले जिज्ञासू https://sanatanprabhat.org/subscribe/ या संकेतस्थळावरून वर्गणीदार होऊ शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे. ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरणे शक्य नसल्यास स्थानिक साधकांनी त्यांना संपर्क करावा. ही सुविधा दैनिक वगळून अन्य नियतकालिकांसाठी आहे.’