जसे ऐश्‍वर्या रायशी प्रत्येक जण लग्न करू शकत नाही, तसेच प्रत्येकालाच उपमुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही ! – कर्नाटकचे मंत्री

कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा

बेंगळुरू – उपमुख्यमंत्रीपद कोणाला नको आहे ? सत्तेची ताकद कोणाला नको असते. तारुण्यात आलेल्या प्रत्येक तरुणाला अभिनेत्री ऐश्‍वर्या रायशी लग्न करावसे वाटते; पण ऐश्‍वर्या तर एकच आहे ना ? नेत्यांना प्रचंड महत्त्वाकांक्षा असते; पण ती पूर्ण होण्यासाठी वाव मिळायला हवा. कारण प्रत्येकालाच उपमुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही, असे विधान कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी केले आहे. ‘अपात्र आमदार निवडणुकीत पुन्हा विजयी झाले, तर त्यांच्यापैकी एकाला उपमुख्यमंत्री करावे लागणार आहे का ?’, असा प्रश्‍न पत्रकारांनी ईश्‍वरप्पा यांना विचारला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले. (यावरून लोकप्रतिनिधींची सत्ता आणि खुर्ची यांच्याविषयीची मानसिकताच दिसून येते ! ही मानसिकता पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !- संपादक)