मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे पत्रक उपलब्ध !

साधकांना सूचना

‘सनातन संस्थे’च्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकात मकरसंक्रांतीचे अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व, तीळगूळ आणि वाण देण्याचे महत्त्व आदी दिले आहे. वाण देण्यास उपयुक्त होतील, असे सनातनचे लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची सूचीही या पत्रकात देण्यात आली आहे. या हस्तपत्रकासाठी प्रायोजक मिळवून त्यांचा धर्मप्रसारासाठी सुयोग्य उपयोग करावा.