गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

अनंत आठवले

त्रिगुणांचे अधिक विवेचन, वर्णानुसार कर्मे आणि त्यांचे महत्त्व,
तसेच कोणत्याही साधनेने पराभक्ती (ब्रह्माशी अभिन्नता) प्राप्त होते, हे सांगणारा

अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग

२.  साधना आणि फळ

२ ई. अंतःकरणात स्थित ईश्‍वराला शरण जाणे : सर्वांच्या अंतःकरणात ईश्‍वर स्थित आहे. त्याला पूर्ण भावाने शरण गेल्याने त्याच्या कृपेने परम शांती आणि ब्रह्म हे अढळ स्थान प्राप्त होईल. (अध्याय १८, श्‍लोक ६२)

विवेचन

पूर्ण भावाने शरण जाणे, यात निष्कामता इत्यादी आधी सांगितलेले पूर्ण दोषनिवारण येते.

२ उ. कार्य-अकार्याचा त्याग करणे : शास्त्रनिर्धारित सर्व कार्य-अकार्याचा त्याग करून केवळ ईश्‍वरात मन लावणे आणि केवळ त्याला शरणागत होणे, यामुळे ईश्‍वर सर्व पापांतून मुक्त करील.  (क्रमश:)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘गीताज्ञानदर्शन’