काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन संमत

आयएन्एक्स मिडिया घोटाळा प्रकरण

नवी देहली – ३०५ कोटी रुपयांच्या आयएन्एक्स मिडिया घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांना सर्वोच्च न्यायालयाने ४ डिसेंबरला जामीन संमत केला आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) नोंदवलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. या वेळी न्यायालयाने चिदंबरम् यांना जामीन देतांना २ हमीदारांसह २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला आहे. याचसमवेत न्यायालयाच्या अनुमतीविना देशाबाहेर जाऊ नयेे, साक्षीदारांना भेटण्याचा प्रयत्न करू नये, असे आदेशही न्यायालयाने चिदंबरम् यांना दिले आहेत. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने यापूर्वीच चिदंबरम् यांना जामीन संमत केला आहे. यामुळे चिदंबरम् यांचा आता तिहार कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.