महिलांना सुरक्षा पुरवण्याची फातिमा नावाच्या महिलेची न्यायालयात याचिका

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे प्रकरण

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश करण्याची मागणी ज्या संस्थेने याचिकेद्वारे केली होती, त्याचा प्रमुख एक मुसलमान होता आणि आता महिलांना सुरक्षा देण्यासाठीची याचिकाही अहिंदु महिलेकडून केली जात आहे. हा हिंदु धर्मावर धर्मांधांकडून कायद्याच्या नावाखाली करण्यात आलेला आघात आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !

नवी देहली – शबरीमला मंदिरात प्रवेश करू इच्छिणार्‍या महिलांना सुरक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी बिंदु अम्मिनी यांच्यानंतर फातिमा नावाच्या केरळमधील आणखी एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. (मशिदीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी याचिका फातिमा न्यायालयात का करत नाहीत ? – संपादक)